उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 ग्रामपंचायत कार्यालय, जकेकुरवाडी व टाटा सामाजिक विज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जकेकुरवाडी गावात  भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन पोलीस अधीक्षीक  तुल कुलकर्णी यांसह उमरगा उप विभागाचे पोलीस उप अधीक्षक  रमेश बरकते, उमरगा पो.ठा. चे पोनि  मनोज राठोड यांना आमंत्रित करण्यात आले. तसेच यावेळी जकेकुरवाडी गावचे सरपंच- अमर सुर्यवंशी तसेच टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे- गणेश चादरे, विस्तार अधिकारी- संजय राऊत, ग्रामसेवक- गणेश माळी यांसह जकेकुरवाडी गावचे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला. 

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आरने व माने सरांन करुन प्रास्थाविक- अमर सुर्यवंशी यांनी केले. यावेळी अध्यक्षीक भाषणात मा. पोलीस अधीक्षक   अतुल कुलकर्णी यांनी जकुकुरवाडी गावात होत असलेल्या विविध विकास कामाचे कौतूक केले. सरपंच, सदस्य व ग्रामस्थ हा त्रिसूत्रीय धागा एकत्र आल्यास गावाच कायापालट होतो, त्याच बरोबर शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करुन अधिकारी बनावेत, अशा विविध विषयांवर त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जि. प. शाळेच्या आवारात फळझाडे लागवड करण्यात आले. त्याच बरोबर गावातील कृष्णानगर तांडा येथे भेट देउन त्यांनी केलेल्या दारु बंदीचे  पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले व सर्वसामाण्य नागरीकांना कधीही अडचण आली तर संपर्क करण्याचे आवाहन केले. तसेच कार्यक्रमादरम्यान रक्तदान शिबीरात गावकरी तसेच पोलीस यांनी मिळुन एकुण 125 व्यक्तींनी रक्तदान केले. सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी गावातील सर्व नागरिक, सदस्य, शिक्षक वर्ग, विद्यर्थ्यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतल्याने मा. पोलीस अधीक्षकांनी त्यांचे कौतुक केले.


 
Top