उस्मानाबाद / प्रतिनिधी 

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे तुकडे करू पाहणाऱ्या गद्दार,सूर्याजी पिसाळ याचा निषेध व्यक्त करत उस्मानाबाद येथे ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि ॲड.रेवण भोसले यांच्या प्रतिमेस सर्वपक्षीय संघटनाच्या वतीने जोडे मारो ,बोंबाबोंब आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.

       २५ नोव्हेंबरला उस्मानाबाद येथे गुणरत्न सदावर्ते यांच्या संविधान परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे तुकडे करण्याचा घाट ॲड. सदावर्ते यांनी घातल्याचं जाहीर झालं. मराठा समाजातील युवकांना पोलिसांनी अक्षरश अतिरिकेप्रमाणे वागणूक देत मुस्कटदाबी केली. हा सर्व प्रकार उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहासमोरील प्रांगणामध्ये घडला. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

     अखंड महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याची भाषा वापरणाऱ्या गद्दारांच्या स्पर्शाने अपवित्र झालेली भूमी पवित्र करण्याचा निर्धार उस्मानाबाद येथील मराठा समाज बांधवांनी दिनांक २६ नोव्हेंबरला पूर्ण केला.

        छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखंड महाराष्ट्राचे तुकडे करू पाहणाऱ्या गद्दार सदावर्ते यांना उस्मानाबादच्या भूमीत आणून सूर्याची पिसाळांची भूमिका बजावणाऱ्या ॲड. भोसले यांचा मराठा समाज संघटनांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. सदावर्ते यांना उस्मानाबाद येथे बोलावून मराठवाडा स्वतंत्र राज्य करण्याचे षडयंत्र रचणाऱ्या भूमिकेत  भोसले यांचाही हात असल्याने या दोघांच्या प्रतिमेला मराठा समाज बांधवांनी निषेध घोषणा देत जोडे मारले. दोघांच्याही प्रतिमेला काळे फासले आणि निषेधाच्या घोषणा दिल्या. 

    अखंड महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न होतं ते स्वप्न कायम राहावे ही मराठा समाजाची भूमिका आहे.मात्र मराठवाड्याच्या भूमीत गद्दारांना सोबत घेऊन भोसले यांनी सूर्याची पिसाळांची भूमिका वठवली याचा मराठा समाज बांधवांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.

   संभाजी ब्रिगेड,अखिल भारतीय छावा संघटना,शिवराज्य सेवा समिती, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांचेसह विविध संघटनांनी निषेध आणि जोडे मारो आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला.


 
Top