उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाअंतर्गत मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र व्दारा उस्मानाबाद औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दि. 14 नोव्हेंबर 2022 रोजी “प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा” चे आयोजन करण्यात आले आहे.

 या भरती मेळाव्यास उस्मानाबाद, औरंगाबाद, पुणे येथील नामांकित कंपन्या उपस्थित राहणार आहेत. तरी ज्या ITI, MCVC उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांपैकी ज्या प्रशिक्षणार्थ्यांना अद्याप शिकाउ उमेदवारी (Apprenticeship) मिळालेली नाही,  त्यांनी  दि. 14 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे उपस्थित राहून शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अंशकालिन प्राचार्य प्रविण अवताडे तसेच सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार कदम एस.एस. यांनी केले आहे.


 
Top