उस्मानाबाद /प्रतिनिधी -

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे व रूपामाता संस्थेचे संस्थापक संचालक  उस्मानाबाद जिल्हा परिषदचे सदस्य पाटोद्याचे माजी सरपंच तथा भाजपचे ज्येष्ठ नेते ज्ञानदेव राजगुरू यांचे (६२) यांचे ह्दय विकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवार दि. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी निधन झाले.त्यांच्यावर दुपारी त्यांच्या मुळगावी  राजगुरू मळ्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्याच्या पश्चात  आई-वडील, पत्नी, तीन मुले, एक मुलगी, नातु असा परिवार आहे. अंत्यविधीस आंबेडकर कारखान्याचे चेअरमन आरविंद गोरे, जि.प.चे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरूजी, अर्चनाताई पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्तात्रय सोनटक्के, रूपामाता उद्योग समूहाचे अॅड. अिजत गुंड, मिलींद खांडेकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, राजेंद्र शेरखाने, शिवसेनेचे नितीन शेरखाने व परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top