उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अन्यायावर मात करण्यासाठी आपल्या युक्ती आणि शक्तीने लढणारे थोर क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे यांची आज जयंती! यानिमित्ताने धाराशिव शहरातील वस्ताद लहुजी साळवे चौकाच्याआमदार कैलास दादा पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून अत्यंत सुरेख प्रतीने करण्यात आलेल्या सुशोभीकरणाचे उद्घघाटन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांच्यासह समाज बांधवांच्या उपस्थितीत अनावरण केले.

तसेच क्रंतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंती महोत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून रक्तदात्यांचे आणि आयोजकांचे अभिनंदन केले. 

जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी ही सिंहगर्जना प्रत्यक्ष जीवनात जगणाऱ्या वस्ताद लहुजी साळवे यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध सशस्त्र लढा उभारून क्रांतीची एक नवी ज्योत प्रत्येकामध्ये प्रज्वलीत करून अनेक क्रांतिकारक घडविले. व्यसनापासून दूर राहत सशक्त आणि बलवान पिढी घडवणे हीच वस्ताद लहुजींना जयंतीदिनी खरी मानवंदना आहे. 

यावेळी शिवसैनिक, जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी, समाजबांधव उपस्थित होते.


 
Top