उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अनु.जाती.वि.जा.भ.ज.इ.मा.प्र.प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीची आवश्यकता असते. परंतू विद्यार्थी समितीकडे वेळेत अर्ज सादर करीत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी शैक्षणिक तसेच इतर लाभांपासून वंचित राहतात.त्यामुळे  महाराष्ट्र राज्याचे  समाज कल्याण आयुक्त आणि  डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बाटी),पुण्याचे महासंचालक यांनी दिलेल्या निर्देशानुसार समिती मंडणगड पटर्न नुसार विशेष मोहिम राबवीत आहे.

 जिल्हयातील सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी अनु.जाती.वि.जा.भ.ज.इ.मा.व वि.मा.प्र. प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज तात्काळ भरून घेऊन या कार्यालयास सादर करावेत. वेळेत अर्ज  न भरल्यास महाविद्यालयांना जबाबदार धरण्यात येईल. अकरावी आणि बारावी विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव विहित वेळेत ऑनलाईन भरून त्याची एक साक्षांकीत प्रत पुरावे जोडून (ऑफलाईन) पध्दतीमध्ये दि.25 नोव्हेंबर 2022 पर्यंत कार्यालयात सादर करावेत.असे आवाहन समितीचे अध्यक्ष डॉ.बी.जी.पवार, तसेच उपायुक्त तथा सदस्य बलभीम शिंदे आणि संशोधन अधिकारी तथा सदस्य बी.जी.अरवत यांनी केले आहे.


 
Top