उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राष्ट्रीय कृषी विकास योजना  प्रती थेंब अधिक पीक या योजनेंतर्गत  2022-23  मध्ये लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती (S.C) व अनुसूचीत जमाती (ST) शेतकऱ्यांकडुन अर्ज मागविण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

  राष्ट्रीय कृषी विकास योजना  प्रती थेंब अधिक पीक या योजनेंतर्गत  2022-23 मध्ये अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सुक्ष्म सिंचनाचा लाभ देण्यासाठी दि.15 ते 25 नोव्हेंबर 2022 या कालावधीत विशेष स्वरुपात मोहीम राबविण्यात येत आहे .

 अनुसुचीत जाती प्रवर्गातील शेतकऱ्याना राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि डॉ.बाबसाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना असे मिळून ठिबक किंवा तुषार संचासाठी 90 टक्के पर्यत अनुदान आहे अनुसूचित जमाती  प्रवर्गातील शेतकऱ्याना राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि  बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना असे मिळून  ठिबक किंवा तुषार संचासाठी  90 टक्के पर्यत अनुदान आहे.

 तरी 2022-23 मधील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याकरीता https://mahadbrnahait.gov.in या संकेतस्थळावर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.


 
Top