उस्मानाबाद / प्रतिनिधी-

बाल दिनानिमित्त प्रशासनाच्या सर्व विभागांमार्फत बाल विवाह निर्मुलनासाठी 14 नोव्हेंबर हा दिवस सक्षम दिवस म्हणून साजरा करण्यात आला. बालकांचे हक्क्, अधिकार यांच्या संरक्षणासाठी, सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

 त्यानुसार दि. 16 नोव्हेंबर 2022 रोजी शिंगोली येथील जिल्हा परिषद प्रशाला, सरस्वती प्राथमिक विदयालय तसेच जुनोनी येथील पांडुरंग माध्यमिक विदयालय या ठिकाणी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्यामार्फत बाल विवाह प्रतिबंधक अधिनियमाच्या प्राचार प्रसिध्दीसाठी जाणिव जागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रशासनाच्या वतीने बाल विवाह निर्मुलन, दत्तक महिना, बाल संगोपन योजना यांची माहिती देण्यात आली. तसेच प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.  या कार्यक्रमात विदयार्थी आणि शिक्षकांना बाल विवाह करणार नाही तसेच बाल विवाहाला सहकार्य करणार नाही अशी शपथ देण्यात आली.

 या कार्यक्रमास सदरील शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक आणि विदयार्थी सहभागी होते. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिविक्षा अधिकारी  एस.बी. शेळके, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी  व्ही.एन देवकर, बाल संरक्षण अधिकारी  प्रज्ञा बनसोडे, कोमल धनवडे, हर्षवर्धन सेलमोहकर, क्षेत्रीय कार्यकर्ता जयश्री पाटील  यांनी केले.


 
Top