परंडा / प्रतिनिधी- 

 राज कोचिंग क्लासेस च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराने सन्मान परंडा येथील राज कोचिंग क्लासेस चे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत 16 विद्यार्थी पात्र झाले असून या गुणवंत विद्यार्थ्यांचा राज कोचिंग क्लासेस परंडा च्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच पालकांच्या वतीने सुजित देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला. 

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी मधील तपस्या विजयकुमार पाटील 298 पैकी 258 गुण घेऊन तालुक्यात प्रथम, संस्कार भारत थिटे 186 गुण तसेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी मधील तेजस कैलास मोरे 298 पैकी 254 गुण, श्रावणी अधिकराव शेळवणे 244 गुण, प्रज्वल राजकुमार गरड 224 गुण, पृथ्वीराज हरिश्चंद्र मिस्किन, 210 गुण, प्राची नितीन नवले 210 गुण, उत्कर्ष संजय शिंनगारे 208 गुण, सुयश तानाजी बोराटे 184 गुण, वैभव रवींद्र गरड 180 गुण, अनुष्का आप्पासाहेब बल्लाळ 178 गुण, वैभवी प्रशांत पंडित 154 गुण, स्वरा शिवाजी दबडे 140 गुण, सृष्टी संदीप विटकर 140 गुण, समर्थ भारत ढोरे 134 गुण, शिवराज तुकाराम मुळीक 126 गुण या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच 2014 च्या बॅच चा विद्यार्थी अविष्कार संतोष नलवडे (MBBS) साठी शासकीय मेडिकल कॉलेज औरंगाबाद येथे निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला .

सत्कार समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कमांडो करिअर अकॅडमी परंडाचे संचालक महावीर तनपुरे (मेजर),सोहेल मोरवे, कैलास मोरे, अधिकराव शेळवणे, रविंद्र गरड, राजकुमार गरड, तानाजी बोराटे, भारत ढोरे,विजयकुमार पाटील, संदीप विटकर,भारत थिटे, काळे,जाधव,नलवडे पालक उपस्थित होते.

 
Top