परंडा / प्रतिनिधी - 

तालुक्यातील पिंपळवाडी , ब्रम्हगांव,आसू येथे शुक्रवार दि .११ रोजी भांडगाव येथे एक दिवस बळीराजासाठी उपस्थित तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रूपनवर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन केळी, पपई, संत्रा, कांदा इत्यादी पिकांची पहाणी केली. तसेच आरणगाव, राजुरी, जवळा ( नि.), जाकेपिंपरी, टाकळी येथील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन तुती लागवड व फळबाग लागवड चे गावनिहाय प्रशासकीय आदेशानुसार शेतकऱ्यांनी या शासकीय योजनेचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे अवाहन केले आहे.

    यावेळी सरपंच अल्का बिरमल भोसले, सरपंच ओव्हाळ जी, उपसरपंच काळे जी, जिल्हा समन्वयक शिल्पा भंडकुभे, ग्रामसेवक तरकसे मॅडम, प्रगतशील बागायतदार सुनील अंधारे, शेतकरी उद्योजक विकासराव रणनवरे, शेतकरी- लघुउद्योग सल्लागार गणेशदादा नेटके, कृषी सहाय्यक जाधव , एपीओ सुधिर देडगे, मयुर करळे, तुषार गायकवाड, नागनाथ भोसले रोजगार सेवक माऊली सुनील आहेर, शशिकांत कुलकर्णी, दादा डाकवाले, जाधव व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top