उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील वैद्यकीय शिक्षण केवळ एमबीबीएस पुरतेच मर्यादित न राहता पदव्युत्तर आणि अतिविषेश पदव्युत्तर अभ्यासक्रम (सुपर स्पेशालिटी), फिजिओथेरपी, डेंटल, नर्सिंग या सर्व शाखेचे अभ्यासक्रम येथे सुरू करून एक परिपूर्ण अद्यावत असे वैद्यकीय संकुल विकसित करण्याची अभिनव संकल्पना आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी मांडली होती व या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण मंत्री   गिरीश  महाजन   यांच्याकडे याबाबत बैठक बोलविण्याची विनंती केली होती. या विनंतीनुसार वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीशजी महाजन यांनी दिनांक १० नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ३.०० वा धाराशिव (उस्मानाबाद) येथे वैद्यकीय शिक्षण संकुल उभारण्या बाबत मंत्रालयात बैठक बोलावली आहे.

  या बैठकीत  उस्मानाबाद येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र व त्या जवळील जलसंपदा विभागाची एकूण ५० एकर जागा या प्रस्तावित संकुलासाठी उपलब्ध करणे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र हे शासकीय तंत्रनिकेतनच्या उपलब्ध रिकाम्या जागेत स्थलांतरित करणे, १००० खाटांचे सुसज्ज असे रुग्णालय व २५० पर्यंतचा विद्यार्थी प्रवेश लक्षात घेऊन वैद्यकीय महाविद्यालयाची रचना करणे, महाविद्यालयाची इमारत व परिसराचे नियोजन करताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा प्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागास एकत्रित बृहत आराखडा तयार करण्यास्तव प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करणे आणि या अंतर्गत वैद्यकीय सल्लागारची तरतूद ठेवणे यामुद्यांच्या अनुषंगाने चर्चा होणे अपेक्षित आहे.

 सदरील बैठकीस अपर प्रधान सचिव महसूल व वन विभाग, प्रधान सचिव जलसंपदा विभाग, प्रधान सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग, आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, जिल्हाधिकारी  उस्मानाबाद , मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे, कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन धाराशिव (उस्मानाबाद), प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र धाराशिव (उस्मानाबाद) व इतर संबंधित अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले आहे.


 
Top