उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पोलीसांच्या वेळी- अवेळीच्या, धकाधकीच्या कर्तव्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. हे ध्यानात ठेउन  पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून जुलै 2022 मध्ये उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी- अंमलदार यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 

त्यामध्ये बऱ्याच पोलीस अधिकारी- अंमलदार यांना अपचन, गॅस, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाचे विकार इत्यादी प्रकारचे आजार तसेच समस्या असल्याचे तपासणीमध्ये दिसुन आले होते. सदर आजार दुर करण्यासाठी आयुर्वेदिक उत्पादने वापरणे आवश्यक असल्याचे मा. पोलीस अधीक्षकांनी  ध्यानात घेउन त्यांच्या प्रयत्नाने टोरेन्ट पावर लि. समन्वय, 600 तपोवन, अंबावाडी, अहमदाबाद या कंपनीच्या सामाजिक दायीत्वातून ट्राईब मॅजीक कंपनीची आयुर्वेदीक उत्पादने उस्मानाबाद पोलीस दलातील अधिकारी- अंमलदार यांच्यासाठी उपलब्ध करुन त्यांना  पोलीस मुख्यालयातील ‘अलंकार सभागृहात’  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आली. 

यावेळी  पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी, टोरेन्ट पावर लि. कंपनीचे अधिकारी वर्ग तसेच उस्मानाबाद पोलीस दलातील अधिकारी- अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.


 
Top