उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हयातील न्यासाचे विश्वस्तांनी आपल्या न्यासासंबंधी लेखा परिक्षण अहवाल वेळेत तयार  करून धर्मादाय आयुक्त कार्यालयात विशिष्ट वेळेत सादर करावेत तसेच त्यावर आकारण्यात आलेले विलंब शुल्क या कार्यालयात तात्काळ भरण्यात  यावेत अन्यथा अशा न्यासावर महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. अशी सूचना येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी केली आहे.

 सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयअंतर्गत येणाऱ्या बहुतांश न्यासाचे लेखापरिक्षण झालेले नसल्याचे आणि  ते या कार्यालयात दाखल केल्याचे दिसून येत नाही. ज्या न्यासाच्या विश्वसतांनी लेखापरिक्षण विलंबाने दाखल केले आहेत अशा लेखा परिक्षण अहवालास विलंब शुल्क आकारण्यात आलेले आहेत.तथापि बहुतांश विश्वस्तांनी असे विलंब शुल्क या कार्यालयात भरल्याचे दिसून येत नाही.

 तेव्हा जिल्हयातील न्यासांचे अध्यक्ष,सचिव,कोषाध्यक्ष यांना सुचित करण्यात येते की, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 32(1)(2) अन्वये सार्वजनिक न्यासांचे लेखे नियमित न ठेवणे,कलम 33(1)(2) अन्वये संतुलित न करणे आणि 24 (1) अन्वये ताळेबंद करून न घेणे हे दंडनीय अपराध आहे.असेही धर्मादाय आयुक्तांनी कळविले आहे.


 
Top