परंडा / प्रतिनिधी - 

परंडा तालुक्यातील साकत ( बु.), पिस्तमवाडी येथे शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन तुती लागवड व फळबाग लागवड चे आवाहन येथील तहसील कार्यालयातील बैठकीत तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनी शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी केल्या सुचना.

 या बैठकीत मार्गदर्शन करताना म्हटले की एक एक्कर तुती लावा आणि ३ लाख ४२ हजार आणि फळबाग लागवड करा क्षेत्र निहाय अनुदान मिळवा.

या बैठकीत गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, कृषी अधिकारी आबासाहेब रूपनवर, नायब तहसीलदार पाडुळे , आर. एफ.ओ.रसाळ, रेशीम अधिकारी मंटूरे ,वि.अ.वग्गे ,कृषी विभाग बोडके ,यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासकीय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन शाश्वत उपजिवीका, कुटुंबाचे उदरनिर्वाह करीता अतिशय चांगला हा उद्योग असल्याची उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. तसेच शेतकरी उद्योजक विकासर रणनवरे व शेतकरी- लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके यांनी तुती उद्योग व फळबाग लागवड क्षेत्रातील सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी ग्रामसेवक पदाधिकारी, तलाठी पदाधिकारी, कृषी सहाय्यक पदाधिकारी, तांत्रिक अधिकारी, व रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे सर्व पदाधिकारी आपल्या गावात मार्गदर्शन करून तुती लागवड व फळबाग लागवड करण्याच्या सुचना देण्यासाठी CFP टिम च्या प्रमुख शिल्पा भंडकुभे, तहसील चे सुधिर देडगे, प्रगतशील शेतकरी विकास रणनवरे, लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके, मयुर करळे, पंचायत चे तुषार गायकवाड, शेतकरी गणेश चव्हाण, दादा चव्हाण आदि उपस्थित होते.


 
Top