उस्मानाबाद/ प्रतिनिधी - 

शहरातील छत्रपती शिवाजी विद्यालयाचे सेवानिवृत्त कलाशिक्षक स्व.बी.बी. हाके यांचे १ नोव्हेंबर २०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. महाराष्ट राज्य कलाध्यापक महामंडळ संघ पुणे द्वारा संचलित शाखा उस्मानाबाद जिल्हा कलाध्यापक संघाच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. 

याप्रसंगी विभागीय सहकार्यवाह तथा जिल्हासचिव शेषनाथ वाघ यांनी स्व. हाके यांच्या स्मितभाषी परंत कार्यमग्न चित्रकला शिक्षक अशी ओळख होती त्यांनी अनेक कलावंत निर्माण केले असे मनोगत व्यक्त केले. श्रद्धांजली अर्पण करते प्रसंगी सेवानिवृत्त संघाचे मार्गदर्शक जेष्ठ कलाशिक्षक एम.डी. तिगाडे , कलाध्यापक संघ जिल्हाध्यक्ष नानासाहेब बोराडे, जिल्हाउपाध्यक्ष गणेश पांचाळ , साईनाथ गांगुर्डे, जिल्हासहसचिव चंद्रकांत माळी, जिल्हाप्रसिध्दी प्रमुख शिवाजी भोसले, अरुण जाधव ,   हणमंत मुळे,रवी तिगाडे, तेर येथील कलाध्यापक पांचाळ ,तुळजापूरचे कलाध्यापक खंडू ताटे, सतिश हुंडेकर, सागर धर्माधिकारी , लातूरचे कलाशिक्षक अमोल देवकते, अमोल जोशी , राजमाने , बीडचे कलाध्यापक विकास शिरसाट,लाशिक्षिका सौ. अश्विनी कुलकर्णी, सौ. पंडित , सौ. गुंजाळ आदि ५ जिल्ह्यातील कलाशिक्षक - शिक्षीका उपस्थित होते.

 
Top