उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्रातील पोलीस पाटील यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने भाजपचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली. 

या संदर्भात गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने आ.पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील पोलीस पाटील यांचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. त्यामध्ये पोलीस पाटील यांना 18 हजार रुपये मानधन मिळावे, निवृत्तीचे वय 65 करावे, नूतनीकरण कायमस्वरूपी बंद करावे, पोलीस पाटील अधिनियम 1967 मध्ये बदल करावा, निवृत्तीनंतर पेन्शन योजना सुरू करावी, पोलीस पाटलांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात, आदी मागण्या प्रलंबित आहेत. आ.पाटील यांनी राज्यातील पोलीस पाटील संघटना पदाधिकारी व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक लावण्याचे व पोलीस पाटील यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. 

यावेळी जिल्हाध्यक्ष हनुमंत देवकते, मीडिया जिल्हाध्यक्ष सुभाष कदम-पाटील, मराठवाडा कार्याध्यक्ष राहुल वाकुरे, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील  पाटील, बालाजी खरात, महिला आघाडी कार्याध्यक्ष अश्विनी वाले, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष जोतिराम काटे, भूम तालुकाध्यक्ष रामदास अर्जुन, वाशी तालुकाध्यक्ष बिभीषण थोरबोले, तानाजी माटे लोहारा, मोहन गुरव, शंकर आहिरे, रुपाली गिरी आदी उपस्थित होते.

 
Top