ढोकी / प्रतिनिधी-

 ढोकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांच्या पथकाने दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या दरोडेखोरांना पकडून बेड्या ठोकल्या. त्यामुळे मोठा दरोडा टाळला. या चमकदार कामगिरीमुळे ढोकी ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.

यावेळी ढोकी येथील समाजसेवक शामराव देशमुख, रामप्रसाद हजारे, कमलाकर वाणी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  ढोकी पोलिसांचे या कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

 
Top