लोहारा/प्रतिनिधी

 माझे एक हजार रुपये दे म्हणत उचलुन आपटल्याने एका २५ वर्षीय युवकाचा जागीच म्रुत्यु झाल्याची घटना दि.६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८: ३० च्या सुमारास लोहारा शहरात घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार लोहारा शहरातील मसणजोगी वस्तीत राहणाऱ्या शंकर व्यंकट कल्लेमुळे हा मुऱ्या ऊर्फ प्रल्हाद गुंडू घोडके याचे १ हजार रुपये घेतले होते. मुऱ्या ऊर्फ प्रल्हाद गुंडू घोडके यांनी त्याला दिलेल्या पैशाची मागणी केली व पैसे दे नाहीतर तुझी मोटार सायकल घेऊन जातो असे सांगितले.शंकर व्यंकट कल्लेमुळे यांनी शुक्रवारी देतो असे सांगितले.शंकर व्यंकट कल्लेमुळे हा शिंदी पिलेला होता.नशेत असतांना देखील मुऱ्या ऊर्फ प्रल्हाद गुंडू घोडके यांनी शंकरला उचलून रोडवर आपटल्याने त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.त्याला त्या अवस्थेत शहरातील एका खाजगी दवाखान्यात घेऊन गेले असता डॉक्टरानी मृत घोषित केले.मयत शंकर मोलमजुरी करून पत्नी,दोन मुले,आई वडील,भाऊ,चुलते याच्या सोबत राहत होता. याबाबत मयताचा चुलत भाऊ सखाराम चंद्रकांत कल्लेमुळे यांनी लोहारा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मुऱ्या ऊर्फ प्रल्हाद गुंडू घोडके याच्या विरोधात कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचा पुढील तपास पो.नि. अजित चिंतले करीत आहेत.

 
Top