तुळजापूर / प्रतिनिधी-

 वडगाव काटी परिसरात दोन दशकापूर्वी दुग्ध व्यवसायिक म्हणून परिचित असणारे शेतकरी कुटुंबातील हनुमंत गवळी यांनी जिद्द चिकाटी आणि परिश्रमाच्या बळावर उनाड  माळरानावर यशस्वी द्राक्ष शेती करून  जिद्द चिकाटी परिश्रमाच्या बळावर  तब्बल पन्नास एकर द्राक्ष बागेचे मालक म्हणून ओळख निर्माण केलेल्या हनुमंत  गवळी यांची परदेशात द्राक्षे निर्यात होत आहेत, मागील वर्षी हनुमंत गवळी यांनी सहाशे टन द्राक्ष परदेशात निर्यात केल्याबद्दल  ग्लोबल  ह्यूमन राइट्स या संस्थेच्या वतीने नवी दिल्ली येथे जागतिक पातळीवरील ग्लोबल ह्यूमन राइट्स या संस्थेने एशिया आयकॉनिक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले.

वडगाव काटी शिवारात पर्जन्यमानाच्या प्रमाणात दरवर्षी विषमता असते, त्यामुळे द्राक्षा सारखे खर्चिक पीक हवामानावर अवलंबून आहे, असे असतानाही गवळी यांनी येथील खडकाळ माळरानावर उत्पादित केलेल्या सहाशे टन द्राक्ष परदेशात निर्यात केली आहेत ,त्याची दखल घेऊन हा त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या प्रगतशील द्राक्ष बागायतदार हनुमंत गवळी यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.

 वैष्णवी ग्रुपच्या माध्यमातून द्राक्ष बागायतदारांना मदत

 द्राक्ष शेती करणे खूप जिकरीचे असून यासाठी द्राक्ष शेतीचा सूक्ष्म अभ्यास असणे अत्यंत गरजेचे आहे , द्राक्ष शेतीचे  ज्ञान अवगत असलेल्या द्राक्ष उत्पादकांचा समूह असणे गरजेचे असून सर्वांच्या विचाराने निश्चितच यशस्वी द्राक्ष शेती होऊ शकते या विचारातून त्यांनी  वैष्णवी द्राक्ष बागायतदार समूह स्थापन करून वैष्णवी ग्रुपच्या माध्यमातून द्राक्ष बागायतदारांना संघटित करून द्राक्ष बागेसाठी आवश्यक असलेल्या बाबींसाठी सहकार्य करायला सुरुवात केली, समूहाच्या माध्यमातून परिसरातील असंख्य द्राक्ष उत्पादकांना मदत होत आहे.


 
Top