तुळजापूर / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यातील हजारो एकर जमिनीवर करण्यात आलेल्या भोगवटदार 2 च्या फेरफार प्रकरणी तुळजापूर येथे शेतकरी संघर्ष समितीची बैठक जिल्हा समितीचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

 यावेळी जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष नारायण नन्नवरे उपस्थित होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील वर्ग 2 च्या जमिनी संदर्भात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन पातळीवर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी तसेच जिल्ह्यातील अनेक गावच्या शेतकऱ्यांनी शेकडो वर्षापासून पिढ्यानपिढ्या ज्या जमिनी कसल्या राखल्या, विकसित केल्या, स्वत: भांडवल उभा करुन अन्न धान्य उत्पादनात भर टाकली. आणि आता त्या शेतकऱ्यांना या जमिनीतुन हुसकावुन लावण्याचा प्रकार घडतो आहे. शासनाने ईतर सर्व ईनामे ज्या पद्धतीने खालसा केली त्याच पद्धतीने देवस्थान ईनाम खिदमतमदत माश मोकासा इनाम अशा प्रकारचे इनाम खालसा करुन या जमिनी शेतकऱ्याच्या नावावर करण्यात याव्यात अशी मागणी घेऊन या पुढं ही समिती जिल्हाभरात शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहणार असल्याचे यावेळी बोलताना शिंगाडे यांनी सांगितलेे.या बैठकीस सज्जन जाधव , नजीर सय्यद,  दत्ता मोघे, भालचंद्र कांबळे, सत्यवान साळवे,उत्तम राजपूत, विठ्ठल घंदूरे, गोपाळ घंदुरे, आनंद जगताप,  रणजित इंगळे यांच्यासह तुळजापूर तालुक्यातील अमृतवाडी , सिंदफळ, अपसिंगा या गावातील असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.


 
Top