तुळजापूर  / प्रतिनिधी-

 हिंदुहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उस्मानाबाद जिल्हा लाठी असोसिएशन, धाराशिव जिल्हा शिवसेना व महिला आघाडी यांच्या वतीने आयोजित तिसरी राज्यस्तरीय लाठी अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा तुळजापूर येथे दिनांक 19 व 20 नोव्हेंबर रोजी शुभारंभ झाला असून राज्यभरातील 22 जिल्हयातील जवळपास 500 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.

तुळजापूर येथील श्रीनाथ लॉन्स मंगल कार्यालयात या स्पर्धेचे आयोजित करण्यात आल्या असून दि.19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता शहरातील पत्रकार बांधव आणि आयोजक यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला,यावेळी  लाठी इंडिया डायरेक्टर महंमद रफी,महागुरू सुभाष मोहिते, अध्यक्ष लाठी महाराष्ट्र प्रा.युसूफ मुल्ला, अध्यक्ष उस्मानाबाद जिल्हा अनिल सगर,सचिव लाठी महाराष्ट्र सुराज मोहिते,शिवराम भोसले महिला आघाडी प्रमूख शामलताई वडणे,जिल्हा उपाध्यक्ष ललितताई सावंत,पत्रकारसंघाचे जिल्हाउपाअध्यक्ष  श्रीकांत कदम, डॉ.सतीश महामुनी,साचीन ताकमोघे उपजिल्हा प्रमुख शाम पवार, युवा जिल्हा सरचिटणीस लखन परमेश्वर यांची उपस्थिती होती.


 
Top