उस्मानाबाद / प्रतिनिधी-

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभे केले. ते उभे करण्यासाठी सर्व समाजातील प्रत्येक घटकांनी योगदान दिले आहे. त्यामुळे प्रत्येक महापुरुषांच्या कारकिर्दीतली एका जरी गोष्टीचे आपण अनुकरण केले तर आपले जीवन सार्थक होईल असे प्रतिपादन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दि.१४ नोव्हेंबर केले.

उस्मानाबाद येथे आद्य क्रांतिवीर लहूजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लहुजी साळवे चौक सुशोभीकरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी  आ. कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, न्यू भारतीय टायगर सेनेचे अध्यक्ष प्रभाकर लोंढे, मारुती लोंढे, माजी नगरसेविका विद्या एडके, प्रवीण कोकाटे, मुकेश शिंदे, देवानंद तिडके, संदिपान झोंबाडे, रवि कोरे आळणीकर,बंडू ताटे, मच्छिंद्र क्षीरसागर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हा मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, फकीरा दलाचे प्रदेशाध्यक्ष सतीश कसबे, लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष शिवाजी गायकवाड, संतोष मोरे, 

रणजीत कसबे, रवी कसबे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना खा. राजेनिंबाळकर म्हणाले की, कोरा नंतर राज्यात सत्तांतराचे मोठे संकट आले होते. आम्ही पक्षाची गद्दारी केली नसून एकनिष्ठ राहिलो. त्यामुळे संकटातून संधी शोधण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.


 
Top