नळदुर्ग / प्रतिनिधी - 

 तुळजापूर तालुका शिक्षक पथसंस्थेच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे, शिक्षक सेवा सहकार पँनलचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाले. .या विजयाने सभासदांनी गत संचालक मंडळाच्या स्वच्छ व पारदर्शक कारभारावर शिक्कामोर्तब केल्याचे दिसून येत आहे.

वार्षिक ११ कोटीची उलाढाल असलेली ५५८ सभासद असलेली ,४६३ मतदार असलेली ही पतसंस्था २०१५ साली संघाच्या ताब्यात आली होती.पूर्णतः नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या पतसंस्थेस गत संचालक मंडळाने पूर्वपदावर आणण्याचे फार मोठे कार्य केले.त्याच कार्याच्या जोरावर हा मोठा विजय झाला आहे.

तुळजापूर तालुका शिक्षक पथसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक लागल्यानंतर निवडणूकीच्या रिंगणात एकूण तीन पँनल होते.शिक्षक संघटनेचे राज्याचे नेतृत्व करणारे नेते पँनलच्या विजयासाठी कष्ट घेत होते.यामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष  बाळकृष्ण तांबारे ,जिल्हा नेते एल.बी.बापू पडवळ  व संघाचे जिल्हाध्यक्ष  संतोष देशपांडे  यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका नेते तथा संस्थेचे चेअरमन  धनंजय मुळे  व तालुकाध्यक्ष  डी.डी.कदम  यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २ नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत शिक्षक सेवा सहकार पँनल निवडणूक लढवून विजय खेचून आणून संघाचा झेंडा पतसंस्थेवर पुन्हा फडकवला.विरोधी दोन्ही पँनलला धूळ चारत फार मोठ्या फरकाने मिळालेला विजय हा तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात चर्चेचा विषय झाला आहे.नवनिर्वाचित संचालकामध्ये  प्रशांत मिटकर,विठ्ठल गायकवाड ,सुनिल सुर्यवंशी,दयानंद जवळगावकर ,सत्तेश्वर जाधव,प्रशांत गायकवाड ,नागेश स्वामी,सोमनाथ निटूरे,अशोक राठोड,सौ.रेखा गोरे,सुनिता गाढवे यांचा समावेश आहे.या विजयासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या सर्व पदाधिकारी व शिलेदारांनी खूप परिश्रम घेतले व सभासदांनी मतदान करून सहकार्य केले.

 
Top