उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून परंडा येथे महाआरोग्य शिबीर कोटला मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे.

 या महाआरोग्य शिबीरा मध्ये सर्व आजारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये कॅन्सर तपासणी, डोळयांची तपासणी, रक्तक्षय तपासणी, हृदयरोग तपासणी,कान-नाक-घसा तपासणी, रक्त तपासणी, हाडांची तपासणी, इसीजी तपासणी, सिकलसेल तपासणी, दंत तपासणी, रक्तगट तपासणी, डोळंयाची तपासणी आणि औषधी वितरण याशिवाय या महाआरोग्य शिबीरात तपासणी नंतर औषधी, वैद्यकिय साहित्य (चष्मे इ.) तसेच आवश्यक त्या रुग्णांच्या शस्त्रक्रीया सुध्दा पुर्णतः मोफत केल्या जाणार आहेत.

 जिल्हयातील जास्तीत जास्त नागरीकांनी या महाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा, असे अवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी,   राहुल गुप्ता, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. राजाभाऊ गलांडे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. किरण गरड रा.आ.अ. यांनी केले आहे.


 
Top