तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील मंगरुळ येथे सर्पदंशाने  दहा वर्षिय वयाची एक लाख तीस हजार रुपये किंमतीची  म्हैस दगावल्याची घटना मंगळवार दि. २९ रोजी दुपारी 2वा. घडली,

या बाबतीत अधिक माहिती अशी की, मंगरुळ (ता. तुळजापूर) येथील जयश्री सुनिल जाधव यांची म्हेंस गोठ्यात बांधली होती. दरम्यान या म्हसींस   साप चावल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेचा पंचनामा मंगरुळ सज्जाचे तलाठी सुरवसे यांनी पंचासमक्ष केला. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे आिर्थक नुकसान झाले आहे.   नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकऱ्याची आहे. 


 
Top