तुळजापूर / प्रतिनिधी-

तिर्थक्षेञ तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिराचे महाद्वारा समोर असलेली दगडी फरशी उखडली आहे. त्यामुळे या वरून जाताना  अनेकजण जखमी होत असल्याने उखडलेली दगडी फरशी नगरपरिषद ने तातडीने  बसवावेत, अशी मागणी होत आहे . 

श्री तुळजाभवानी मंदीराला पुरातन लुक येण्यासाठी तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत नगरपरिषद मार्फत लाखो रुपये खर्चुन मंदीर महाद्वारा समोर दगडी  पायऱ्या करण्यात आल्या  परंतु सदरील काम निकृष्ट दर्जाचे केल्याने काही वर्षात या दगडी फरशीचे दगड उखडु लागले आहेत. या  दगडांना  थडकुन भाविक जखमी होत आहेत. दगडी फरशी माध्यमातून तुळजापूर विकास प्राधिकरण  अंतर्गत भाविकांनसाठी केलेल्या कामांचा उद्देश सफल झाला नसल्याचे दिसुन येते. या प्रकरणी दोषीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


 
Top