तुळजापूर / प्रतिनिधी

भारतात ब्रिटनहुन परत आणण्यात येणारी जगदंबा तलवार ही छत्रपती शिवरायांची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वस्तू संग्रहालयास देण्यात यावी अशी मागणी जनसेवा प्रतिष्ठानचे इंद्रजित सांळुके यांनी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे केली  आहे.

  ब्रिटनहून केंद्र सरकारच्या माध्यमातून ब्रिटनचे भारतीय वंशाचे  पंतप्रधान श्री ऋशि सुनक यांना पाठपुरावा करून महाराष्ट्रात परत आनण्यासाठी राज्य सरकारने जे पाऊल उचलले आहे ते सर्व महाराष्ट्रवासियांना अमुल्य आशी भेटच ठरनार आहे . छत्रपती शिवरायांच्या राज्यभिषेकाच्या 350 व्या वर्षपुर्ति सोहळ्यापुर्वी आनण्याचा मानस राज्य सरकारचा आहे . भारतात परत येणारी जगदंबा तलवार ही छत्रपती शिवरायांची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थान च्या वस्तू संग्रहालयास देण्यात यावी . म्हणजे छत्रपती शिवरायांच्या मर्णोतर 350 वर्षा नंतर छत्रपतींच्या विचार धारेच्या राज्य सरकार कडून आई तुळजाभवानीला अमुल्य असा नजराना ठरेल  आणि हा नजराना राज्यातीलच नव्हे तर सबंध देशवासियांच्या आजन्म स्मरणात राहिल व याची ईतिहासात नोंद होईल . तसेच देश विदेशातून आई तुळजाभवानी मातेच्या भक्तांना आई तुळजाभवानी मातेच्या दर्शना बरोबर छत्रपति शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या जगदंबा तलवारीचे ही दर्शन घेता येईल .  तरी राज्य सरकारने ही जगदंबा तलवार श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला सपुर्द करण्यासाठी आपण  पाठपुरावा  करावा, अशी मागणी इंद्रजित सांळुके व सागर कदम यांनी केली आहे. 

 
Top