लोहारा/प्रतिनिधी

  जिल्हा परिषद शाळा लोहारा येथे सन 1993 पहिलीची बॅच यांचा व माजी शिक्षकांचा स्नेह मेळावा दि.31ऑक्टोंबर रोजी संपन्न झाला. याप्रसंगी शाळेबद्दल एक कृतज्ञ म्हणून शाळेला 25 सिलिंग फॅन भेट म्हणून देण्यात आले.या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले,लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल,इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी माजी शिक्षकांचा फोटो फ्रेम,पुष्पगुच्छ,हार,शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर बेशकराव, सुभाष चव्हाण,मुख्याध्यापक मधुकर रोडगे, माजी मुख्याध्यापक दिनकर कुलकर्णी, सेवानिवृत्त शिक्षक शरणाप्पा जट्टे,शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्ष के.डी. पाटील,प्रशांत लांडगे,अदि,उपस्थित होते.या कार्यक्रमास आजी माजी शिक्षक एस.एम. शेख,माळी, कांबळे मॅडम,बी.डी.बादुले सर,घोडके सर,माळी मॅडम,पी. एम.बडूरे,डी. एम.फावडे,संजय संदिकर, केंद्र प्रमुख मोहन शेवाळे,यांच्यासह विद्यार्थी पांडुरंग घोडके,हरी पवार, वसीम पठाण,शकुर पठाण, जावेद शेख, अशोक हंचाटे, मनोज बादुले,सुशांत कांबळे, खासीम मुल्ला,शाम कोरे, शामसुंदर नारायणकर,लिबराज कटके,बाळु माशाळकर, गणेश काटगावे,अमोल माळी,योगेश मिटकरी, हरी पवार,संतोष शेवाळे,सुधीर कदम,योगेश वाघमारे,ईलाही सवार यांच्यासह आजी माजी विद्यार्थी,शिक्षक उपस्थित होते.

 
Top