उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यातील 72 बिअरबार व परमिट रूमच्या परवाने व नूतनीकरणला जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी मान्यता दिली असून 22 प्रकरणे नामंजूर करण्यात आली आहेत.

 जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस अधीक्षक गणेश बारगजे यांनी याबाबत 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता सुनावणी घेतली होती. यावेळी 94 प्रस्ताव सादर करण्यात आले त्यावेळी 72 अर्ज मंजुर करण्यात आले.

 
Top