उमरगा / प्रतिनिधी-

 उमरगा तालुक्यातील २३ व लोहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या दि.१८ डिसेंबर २०२२ रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत गावकी-भावकी मधील वाद, निवडणुकीत होणारा खर्च, टाळण्यासाठी यावेळीही ग्रामपंचायत निवडणुकी बिनविरोध निवडणूक पार पाडणाऱ्या गावांना आमदार निधी व इतर योजनांच्या माध्यमातून २५ लक्ष रु. निधी देण्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी जाहीर केले आहे.  

           २०२१ साली उमरगा तालुक्यातील 49 व लोहारा तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली होती. यावेळी आमदार  ज्ञानराज चौगुले यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन करीत निवडनुक बिनविरोध करणाऱ्या गावांना २५ लक्ष रु. निधी देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार बिनविरोध झालेल्या १३ ग्रामपंचायतींना विविध शासकीय योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊन त्यांनी दिलेला शब्द पाळला होता. 

            यापैकी जकेकूर - ३० लक्ष, जकेकूरवाडी - २५ लक्ष रु., मुळज - ४० लक्ष रु., मातोळा - १५ लक्ष रु., एकोंडी ज.- ३१ लक्ष, चिंचकोटा - १५ लक्ष रु., कोळसूर गुंजोटी - २५ लक्ष रु., पळसगाव - ३५ लक्ष रु,  भिकार सांगवी / पारसखेडा - २६ लक्ष रु.,  बाभळसूर - १५  लक्ष रु., आरणी - १५ लक्ष रु., धानूरी - ३० लक्ष रु., मार्डी - १५ लक्ष रु. याप्रमाणे निधी विविध योजनांच्या माध्यमातून आ . चौगुले यांनी मागील २ वर्षात उपलब्ध करून दिला आहे. उर्वरित निधीहि  संबंधित गावांना लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

     उमरगा लोहारा तालुक्यातील सर्व नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आपापल्या गावातील निवडणुका  बिनविरोध पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे

 
Top