उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणीचे गठण मंगळवारी (दि.29) करण्यात आले. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र कोंढारे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील, मराठवाडा अध्यक्ष गोपाळराव चव्हाण, मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष नारायण थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार  जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे व महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई लोमटे यांनी नूतन कार्यकारिची निवड केली. निवडीनंतर नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

 नूतन कार्यकारिणीत उपजिल्हाध्यक्षपदी सतीश (बंडू) आदरकर, जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी वसंतराव जाधव, युवती जिल्हाध्यक्ष देवकन्या परमेश्वर गाडे, विधिज्ञ विभाग जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पृथ्वीराज बाबासाहेब कोकाटे, शहराध्यक्ष अ‍ॅड. ढेंगळे, उमरगा तालुकाध्यक्ष संजय माने पाटील, लोहारा तालुकाध्यक्ष संभाजी पवार, जिल्हा संघटक अश्विनी संजय जगताप, मीडिया विभागप्रमुख संदीप जाधव, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष संजय कालिदासराव पाटील, तुळजापूर शहराध्यक्ष जगदीश जीवनराव कदम, तुळजापूर तालुकाध्यक्ष दिनेश सुनील बागल, उस्मानाबाद तालुका उपप्रमुख दीपक  बंकट यादव, शहर कार्याध्यक्ष सुरज मुकुंद सुरवसे यांची निवड करण्यात आली.

 निवडीनंतर नूतन पदाधिकार्‍यांचा जिल्हाध्यक्ष मुंडे यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मिलिंद कोकाटे, मनोज केजकर, मंगेश काटे, विनोद केजकर, अजय नाईकवाडी, गुणवंत यादव यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 जानेवारीत भव्य महामेळावा

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने महिला सशक्तिकरण या विषयावर उस्मानाबाद येथे जानेवारी महिन्यात महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी सर्व पदाधिकार्‍यांनी जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री.मुंडे यांनी केले.


 
Top