नळदुर्ग / प्रतिनिधी-

तुळजापूर येथे पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी गेलेल्या नळदुर्ग येथील शिष्टमंडळातील काही युवकांना कारण नसताना अश्लील शिवीगाळ करीत बेदम मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे श्री.सुशांत भुमकर व इतरांनी तक्रार दाखल केली आहे.त्याची दखल राज्य पोलीस तक्रार प्रधिकरणाने घेतली आहे.

 याबाबत माहिती अशी की,नळदुर्ग येथील विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ नवरात्राच्या दरम्यान पोलिस अधीक्षकांना भेटण्यासाठी गेले होते.मात्र पोलिसांनी त्यांना मध्येच अडवुन शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली होती.पोलिसांच्या या कृत्याचा समस्त नळदुर्गकरांनी जाहीर निषेध केला होता.यावेळी जखमी झालेले माजी नगराध्यक्ष श्री.दत्तात्र्य दासकर,लहुजी शक्‍ती सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री.शिवाजी गायकवाड,भाजपचे माजी शहराध्यक्ष श्री.पद्माकर घोडके,श्री.सुशांत भूमकर यांनी तातडीने तुळजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.महिनाभरानंतरही पोलिस अधीक्षकांनी कोणतीच कारवाई न केल्याने श्री.सुशांत भुमकर व इतरांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी,उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती सई भोरे-पाटील,पोलिस निरीक्षक श्री.आजिनाथ काशीद यांच्या विरुद्ध राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली आहे.न्यायमुर्ती श्री.श्रीहरी डावरे व श्री.उमाकांत मिटकर यांच्या न्यायपीठासमोर दि.१४ डिसेंबरला याची सुनावणी आहे.

 
Top