उस्मानाबाद / प्रतिनिधी-

रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या “विवेकानंद” नियतकालिकाला एक वैभवशाली परंपरा असल्याने या नियतकालिकातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या साहित्य लेखनाला प्रसिध्दी मिळते व या अंकाचा एक मोठा वाचक वर्ग असल्याने विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याला वाव मिळत असतो.”गुलमोहर भित्तिपञिका”व “विवेकानंद”नियतकालिकातून लिहिणारे विद्यार्थी पुढे लेखक कवी म्हणून उदयाला येतात.या नियतकालिकामुळे अनेक कवी,लेखक निर्माण झाले आहेत.असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात १७आँक्टोंबर रोजी,”विवेकानंद वार्षिक अंक(२०२१—२२)च्या प्रकाशन समारंभात बोलताना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी केले आहे.

यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा.नानासाहेब पाटील,”विवेकानंद” नियतकालिकाचे संपादक प्रा.राजा जगताप,उपप्राचार्य,डाॅ.शांतीनाथ घोडके,प्रा.बबन सूर्यवंशी,प्रा.डी.एम.शिंदे.नॅक समन्वयक प्रा.डाॅ.एस.एस.फुलसागर,प्रा.डाॅ.जिवन पवार,रजिस्टार श्री.डी.एम.लोकरे,मुख्य लिपिक श्री.सुभाष पिंगले उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांनी शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांचे प्रतिमांचे पूजन केले. प्रास्ताविक करताना प्रा.राजा जगताप म्हणाले की,कोरोना काळात विवेकानंद नियतकालिकाचा अंक निघू शकला नाही माञ विद्यार्थ्यांच्या साहित्य  कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यातला लेखक जागृत करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली व विभागीय संपादकांनी सहकार्य केल्याने हा अंक आकर्षक झाला आहे.

पुढे बोलताना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की,”विवेकानंद वार्षिक अंक”म्हणजे त्या वर्षातील महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख म्हणजे एक प्रकारचा आरसाच असतो हा अंक संपादक मंडळाने आकर्षक काढल्याने आनंद झाला आहे.यावेळी महाविद्यालय विकास समितीची बैठक पार पडली या बैठकीपूर्वी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व माजी आमदार सुरेश पाटील यांचे दु:खद निधन झाल्याने त्यांना महाविद्यालयाच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली वाहाण्यात आली.


 
Top