तु


ळजापूर  / प्रतिनिधी-

शेतकऱ्यांना सध्या कुणीही  वाली नसल्याचे स्पष्ट करुन मी शेतकरी पुञ असल्याने त्यांचा साठी काम करुन त्यांना मदत करुन जास्तीत जास्त भाव देण्याचा माझा प्रयत्न असेल,असे प्रतिपादन  कचेश्वर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार  दिलीपराव माने यांनी केले. 

मंगळवार दि.१८रोजी  कंचेश्वर शुगर लि. मंगरुळच्या आठव्या गळीत हंगामाचे मोळी पुजन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार  दिलीपराव माने   यांचे  हस्ते संपन्न झाला आहे. 

यावेळी   पुढे बोलताना दिलीप माने म्हणाले की , शेतकऱ्यांशी ऋणानुबंध कसे आहेत ते विस्तारीत केले व ते स्वतः शेतकरी कुटूंबातील असून जीवनभर शेतक-यासाठी काम करण्याचा संकल्प जाहीर केला . कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष  दिलीपराव माने   यांनी ७ लाख मे.टन ऊस गाळप करण्याचा मानस व्यक्त केला आहे तसेच मागील हंगामातील ऊस बिले प्र.मे.टन रु .२००० / - प्रमाणे पहिला हप्ता अदा केलेला असुन दुसरा हप्ता प्र.मे. टन रु .१०० / - प्रमाणे व तिसरा हप्ता १७/१०/२२ रोजी प्र.मे. टन रु .१०१ / - प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याचे जाहीर केले तसेच व्यवस्थापनाच्या धोरणाप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना पगारवाढ व दिवाळी सणानिमित्त ८.३३ % बोनस जाहीर केलेला आहे व चालु गळीत हंगामासाठी कारखान्याची सर्व मशिनरी , ऊस पुरवठा करण्याचे ट्रक / ट्रॅक्टर - २५० , डंपिंग १५० व हार्वेस्टर मशीन १५ अशी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज असल्याचे सांगीतले.शेतकऱ्यांनी तेरा चौदा महिन्यानंतर ३५ ते ४२ काड्या ऊस झाल्यानंतर घालावा यामुळे टनेज व रिक्वयरी मध्ये वाढ होवुन फायदा होते.  व्हा . चेअरमन  पृथ्वीराज माने बोलताना म्हणाले की, शेतकऱ्यांनी कंचेश्वर वर विश्वास ठेवावा त्यांच्या विश्विसाला तडा जावु देणार नाही असे स्पष्ट करुन उपस्थितींचे आभार मानले . 

  यावेळी कारखान्याचे चेअरमन धनंजय   भोसले ,  मुख्य कार्यकारी अधिकारी  संजीवकुमार जाधव , जनरल मॅनेजर  लक्ष्मण गाढे , जनरल मॅनेजर अॅग्री श्री अर्जुन बाराते , वर्क्स मॅनेजर श्री अजित कदम , चिफ केमिस्ट   सुंदरराव साळुंके , डिस्टलरी मॅनेजर  उत्तम हायकर तसेच सभासद ऊस उत्पादक , तोडणी वाहतुक ठेकेदार व सर्व कर्मचारी उपस्थित होते.


 
Top