नळदुर्ग / प्रतिनिधी -

 भाजपाचे तुळजापुर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा वाढदिवस दि.२९ ऑक्टोबर रोजी नळदुर्ग शहरात शहर भाजप व युवा मोर्चाच्या वतीने विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार पाटील यांचा शहरवासियांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

 नळदुर्ग शहरात आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा ५१ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रारंभी सायंकाळी साडेसात वाजता मराठा गल्ली येथे सुरू असलेल्या श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास आमदार पाटील यांनी भेट देऊन माऊलीचे दर्शन घेतले. यावेळी पारायण समिती व शिवशाही तरुण मंडळाच्या वतीने बलभीमराव मुळे यांनी आमदार पाटील यांचा सत्कार केला. यावेळी बलभीमराव मुळे यांच्यासह पारायण समिती व शिवशाही तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यानंतर भवानी चौकात झालेल्या मुख्य कार्यक्रमात आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा वाढदिवसानिमित्त शहरांतील सर्व पक्षीय नेत्यांकडून भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नियोजन समितीचे माजी सदस्य शिवाजीराव मोरे हे होते. तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, विक्रम देशमुख, माजी नगराध्यक्ष नय्यर जहागिरदार,उदय जगदाळे, शहेबाज काझी संजय बताले, मुश्ताक कुरेशी,शफीभाई शेख, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर घोडके, माजी जि. प.सदस्य ऍड. दीपक आलुरे, वसंतराव वडगावे,शब्बीर कुरेशी, निरंजन राठोड,संजय विठ्ठल जाधव, भाजपाच्या उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुशांत भुमकर,भाजयुमोचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, भाजपाचे शहर अध्यक्ष धीमाजी घुगे, पद्माकर घोडके, सागर हजारे, विशाल डुकरे, सचिन घोडके यांच्यासह नागरीक विशेष करून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहर भाजप व भाजयुमोच्या वतीने शहरातील गरीब २५१ महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर यावेळी प्रधानमंत्री ग्रामिण रोजगार योजनेत मुद्रा लोण योजनेअंतर्गत महिलांना मंजुर झालेल्या कर्जाच्या मंजुरीचे पत्र आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

  नळदुर्ग शहरात आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा वाढदिवस पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात व विविध समाजपयोगी कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. हा वाढदिवसाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नय्यर जहागिरदार यांच्यासह शहर भाजप व भाजयुमोच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.


 
Top