तुळजापूर / प्रतिनिधी - 

दिपावली व सलग  सुट्यांच्या पार्श्वभूमीवर  तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी  शुक्रवार ते रविवार  या तीन दिवासाच्या काळात   देविदर्शनार्थ भाविकांची तुफान गर्दी झाली होती. शुक्रवार साडेतीन लाख   व शनिवार  दीड लाख रविवार  दोन  लाख भाविकांनी देवीदर्शन घेतले.

भाविकांच्या वाढत्या संखेच्या पार्श्वभूमीवर नियोजन,कोलमडल्याने याचा भाविकांना मोठा ञास सहन करावा लागला मुलभुत  सध्या स्वच्छतागृहाची ही मुलभुत   सुविधा  पैसे देवुन विकत घ्यावी लागल्यामुळे तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत करण्यात आलेल्या ३०० कोटी रुपये विकास कामांच्या बाबतीत भाविकांनमधुन प्रश्न विचारला जात असुन या कामांची गुननियञंक पथका मार्फत  चौकशी करुन निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदार व संबधित अभियंते यांच्यावर गुन्हे   दाखल करण्याची मागणी ञस्त भाविकांन मधुन केली जात आहे

 भाविकांची वाढतीगर्दी पाहुन  देवीदर्शन १नोव्हेबर २०२२पर्यत सलग  २२ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे भाविकांना काही अंशी दिलासा मिळत आहे .


 
Top