तुळजापूर/ प्रतिनिधी-

 बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तामलवाडी येथे शेतकऱ्यांसाठी  थकीत कर्जापोटी शेतकऱ्यांचे अकाउंट होल्ड करून त्यांची खाती गोठवण्यात आली होती. त्यासंबंधी आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाब विचारण्यात आला व ही खाती पूर्ववत  करण्यात आली व शेतकऱ्यांना सरसकट आलेले अनुदान व पिक विमा 2020 देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तामलवाडी यांच्या कडे मागणी करण्यात आली.

  यावेळी  विधानसभा अध्यक्ष शिवश्री महादेव  मगर, तालुका उपाध्यक्ष अण्णासाहेब कोंडकर उपस्थितीत होते.     संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाला यश आल्यामुळे शेतकऱ्यांचे दिवाळी साजरी होईल अशा अनेक शाखा अधिकारी शाखा उपाधिकारी या दोघांचे आभार व्यक्त केले.


 
Top