तुळजापूर/ प्रतिनिधी-

तालुक्यातील मौजे देवसिंगा ( तुळ ) येथे साठवण तलाव आहे. दरम्यान पडत  असलेल्या पाऊसामुळे  शेत जमीन गट नं. २१९ आणि २१८ मध्ये तलावाचे अतिरीक्त  पाण्याचा प्रवाह सांडव्यातून लगतच्या शेतात जावून अतिप्रवाही पाण्यासोबत तीन ते चार शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान गेली अनेक दिवसा पासुन होत  आहे.

 तुळजापूर तालुक्यात आजपर्यत 1343मिमि आजपर्यत पाऊस झाल आहे.यात मौजे देवसिंगातुळ साठवण तलावा लगत असणाऱ्या    विलास लक्ष्मण जाधव , सौ . आशा विलास जाधव , बालाजी लक्ष्मण जाधव यांच्या शेतातील सुपीक माती वाहून गेल्याने ऊस आणि ईतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . सदरील प्रकार सतत घडलेला आहे . मात्र ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे . त्यामुळे जमीन खरडून गेल्याने जमिनीची सुपीकता नष्ट झाली आहे . त्यामुळे झालेल्या नुकसानीचे भरपाई शासनाने तात्काळ द्यावी . 

तरी  खोलीकरण करून धोक्याचे नदी भागावर जबूत दगडी पिचींग करण्याची मागणी जाधव कुटूंबियानी निवेदनाव्दारे तहसिलदार तुळजापूर , सहाय्यक अभियंता श्रेणी १ उस्मानाबाद पाटबंधारे उपविभाग क्र . ७ नळदुर्ग ता . तुळजापूर , कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.


 
Top