उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत निदान झालेल्या क्षयरुग्णांना उपचार आणि आहार संदर्भात केंद्र सरकारने अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत रोटरी क्लब उस्मानाबाद यांनी वीस क्षयरुग्ण सहा महिन्यांकरिता दत्तक घेतले आहे. दत्तक घेतलेल्या वीस क्षयरुग्णांना आज दि. 21 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय येथे पोषण आहाराचे वाटप करण्यात आले आहे.

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. दंडवते, जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ फिजिशन डॉ. राजाभाऊ गलांडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तानाजी लाकाळ, रोटरी क्लब सदस्य तथा जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन देशमुख, केमिस्ट असोसिएशनचे कुणाल गांधी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कोठावळे, डॉ. कैलास गिलबिले, मेट्रन श्रीमती गोरे तसेच जिल्हा क्षयरोग केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

तरी जिल्ह्यातील क्षयरुग्णांना सहा महिने ते तीन वर्षासाठी अतिरिक्त पोषण आहाराकरिता दत्तक घेण्यास समाजातील इच्छुकांनी आपणहून पुढे यावे आणि निक्षय मित्र होऊन उस्मानाबाद जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी आपले मोलाचे योगदान द्यावे. असे आवाहान जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रफिक अन्सारी यांनी केले आहे. यासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालय उस्मानाबाद येथे समक्ष अथवा dtomhobd@rntcp.org या ईमेलवर संपर्क साधावा.


 
Top