उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळ, “मानाचा गणपती- धाराशिवचा महाराजा “ गणल्या गेलेल्या मंडळास  महाराष्ट्र शासनाच्यावतीने सर्वोत्कृष्ट मंडळ म्हणून निवड करण्यात आली. जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट मंडळ म्हणून प्रमाणपत्र , पुरस्कार व रोख रकमेच्या स्वरूपात मुंबई येथे होणाऱ्या शासकीय सत्काराच्या व समारंभाच्या कार्यक्रमात 18 ऑक्टोबर 2022 रोजी रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन्मान केला जात आहे .

 मंडळ स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत व 58 वर्षाच्या कालावधीमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जनसामान्यांची या गणेशोत्सवाच्या माध्यमातून सेवा करीत आले आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते निस्वार्थ मनाने विविध क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने कार्य करीत आहे. भक्ती ,उत्साह, जोश, शक्ती, सेवा, त्याग, निस्वार्थीपणा, जनकल्याण- जनप्रबोधन ,सर्वधर्मसमभाव, राष्ट्रीय एकात्मता इत्यादी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून या उत्सवातून लोकमान्य  टिळकानी राष्ट्रीय चळवळ भारतीयत्वाची जाण निर्माण करण्याचा व निर्व्यसनीपणा युवकांच्या मध्ये निर्माण व्हावा,या उद्देशाने स्वातंत्र्यपूर्व काळात तालमीत गणेश उत्सव साजरा केला जात होता. तो 1964 पासून स्वर्गीय बंडू गवळी यांच्या संस्थापनेच्या भूमिकेतून चौकामध्ये बसवण्याची परंपरा सुरू करण्यात आली. सार्वजनिक स्वरूपात समाजसेवेचे व्रत व राष्ट्रीय कार्य सदभावणेने अंध, अपंग, मतिमंद या दिव्यांग व गरजू व हुशार विद्यार्थ्यांना मदतीचे कार्य,  स्त्रीभ्रूणहत्या रोखावी, मुलींचे जीवनमान उंचावेल,  मुला मुलींना समान दर्जा मिळावा, व्यसनमुक्त युवा युवती  निर्माण व्हावी. अशा विविध उद्दिष्टांना घेऊन मंडळ आजही कार्य करीत आहे .1964 पासून मंडळांनी श्रीच्या समोर विविध देखावे ऐतिहासिक  पौराणिक, धार्मिक व सध्याच्या कालावधीमध्ये ज्वलंत प्रश्नावर देखावे हलते  यातून प्रबोधन व्हावे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून परिवर्तनाची व बदलांची अपेक्षा घेऊन कार्यरत आहे .

मंडळाच्या या रंगमंचावर देखावे बिना साच्याच्या मुर्त्या बनवण्याचे कार्य मंडळाचे कार्यकर्ते ,कलाकार, चित्रकार ,मूर्तिकार, व्हॉलीबॉलचे राष्ट्रीय खेळाडू ,गुणवंत कामगार पुरस्कार व एसटी महामंडळातील लेखा विभागातून सेवानिवृत्त झालेले, श्री काशिनाथ दिवटे यांनी आज गेली 58 वर्ष झालं निस्वार्थ भावनेने आपली भक्ती अर्पण, आपल्या बोटातून कला पूर्णपणे उतरवण्याची कामगिरी करीत आहेत.मंडळाने अवयवदान, अन्नदान, रक्तदान, नेत्रदान, देहदान व विविध कालावधीमध्ये प्रचार व प्रसार करीत आहे  पोलिओ लसीकरणाच्या वेळी मंडळाने स्वयंसेवक म्हणून कार्यकर्ते उपलब्ध करून दिले व कार्य केले. मंडळाने विविध व्याख्यातेचे व विचारवंताचे वैचारिक प्रबोधनात्मक  व्यासपीठ निर्माण केले या व्यासपीठावरून माननीय विचारवंत मृत्यूंंजय  लेखक शिवाजीराव सावंत, डॉक्टर यु. म.पठाण, डॉक्टर नसिमा पठाण ,डॉक्टरबा.ह.कल्याणकर डॉक्टर ता. रा. भोसले, श्रीराम गोजमगुंडे, रंगाअण्णा वैद्य, शरद तळवळकर ,विलासरावजी देशमुख  सिंधुताई सपकाळ  कमलताई ठकार  रामदास आठवले ,अरुण गुजराथी ,डॉक्टर पद्मसिंह पाटील व माननीय शरदचंद्रजी पवार धनंजय मुंडे शंभू लिंग शिवाचार्य महाराज राज योगिनी ब्रह्माकुमारी उषा बहिर्जी, स्वामी हरि चैतन्य महाप्रभू जी, अभिनेत्री तेजस्विनी पंडित, सोनाली कुलकर्णी आदीने आपले विचार, मंडळाच्या कार्याचे कौतुक या विविध मान्यवरांनी केले गेलेले आहे, मंडळांनी गेली 58 वर्षापासून दीडशे मुला मुलींचे लेझीम पथक आजही श्रीच्या प्रतिष्ठापन्नेपासून व विसर्जनापर्यंत लेझीमच्या खेळातील विविध असणाऱ्या कलापूर्ण प्रकाराने खेळ खेळला जातो व आनंदाने  मिरवणुकीत सहभाग आजही तागायत आकर्षक, जिवंत खेळ ठेवला.लेझीमच्या खेळाची ही परंपरा देशपातळीवर व प्रजासत्ताक दिन पातळीवर लेझीमचा खेळ दाखविण्यात येत आहे. अलाहाबाद, विजयवाडा, हैदराबाद (आंध्र प्रदेश), चेन्नई येथे लेझीमचे खास पथक खेळ दाखवून , 74 व्या अखिल भारतीय रेल्वे,जागतिक रेल्वे मैदानी स्पर्धेवेळी उदघाटनवेळी लेझीम खेळ सादर  करून धावपटू सुवर्णकन्या पी.टी.ऊषा  यानी कौतुक  केले. मर्दानी व मैदानी रणवाद्याने दाखवण्याचे कार्य व महाराष्ट्राचे लेझीम खेळाचे श्रीक्षेत्र तिरुमल्ला तिरुपती येथे वार्षिक ब्रह्मोत्सवात गेली चार वर्ष लेझीम खेळाचे प्रात्यक्षिक , बालाजीच्या छबिनासमोर खेळण्याचा मान मिळालेला आहे. मंडळ कार्य करीत असताना महाराष्ट्राची व जिल्ह्याची शान व मान उंचावेल या राष्ट्रीय कार्यास प्राधान्य देऊन काम करीत आले आहे. 

महाराष्ट्रावर व इतर राज्यावर आपत्ती कोसळली असेल तर त्यावेळी देखील मदत निधी, मुख्यमंत्री निधी, आपत्तीग्रस्त निधी, भूकंपग्रस्त निधी, शहीद जवानांच्या कुटुंबांना मदत, विदर्भ पूरग्रस्तांसाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा निधी, आजी-माजी शहीद जवानांच्या कुटुंबासाठी सैनिक कल्याण निधी, मंडळांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. मंडळांनी 2015 मध्ये मंडळास मिळालेल्या पारितोषकाची रक्कम दुष्काळ ग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात आलेली आहे. कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन कार्यक्रमात मंडळाने कुटुंब नियोजन  करण्यात कार्यात रक्कम दिल्याबद्दल 

समितीवर जिल्हा पातळीच्या सदस्य काम करण्याची संधी.  विविध कार्यामध्ये पुढाकार व अग्रसेर  मंडळ.  विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून, त्यांच्या सुप्त कलागुणांना विकसित करण्याचे कार्य मंडळ करीत आहे. गुटखाबंदी एड्सरोग निर्मूलन,  कुपोषण, क्षयरोग ,जलस्वराज्य ,पर्यावरण इत्यादी क्षेत्रातील चित्र प्रदर्शन व जनजागृतीसाठी कार्य करीत आहे. महिलांसाठी व बालिका जन्मोत्सव स्त्रीभ्रूणहत्या रोखावे ,मुलीच्या जन्माचे स्वागत, प्राथमिक शाळेतील पहिल्या वर्गातील मुला मुलींचे स्वागत, वाचन प्रेरणादिन, नेत्ररोग, दंतरोग, नाक -कान -घसा रोग व सर्व  रोग, आरोग्य तपासणी लहान मुलांची करून,  आपले भावी  सुनागरिक- बलवान - सुदृढ निरोगी असावी या भावनेपोटी तपासणी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत व औषधोपचार करीत आले आहे. 

बालविवाह प्रतिबंधात्मक पंधरवड्यात बालविवाह प्रतिबंध कायद्यावर आधारित बालनाटिका बालकलाकारांच्या माध्यमातून सादर करून बालविवाह रोखला गेला पाहिजे . बालिकांची शारीरिक- मानसिक विकासाची पातळी काय असावी .याबद्दल जनजागृती मंडळ करते.

महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त लोकराज्य  विशेषांकाचे जनसामान्यांपर्यंत वाटप,स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमचे नियोजन केले आहे.

मतदार राजा जागे हो ,मतदान हे लोकशाहीला बळकटी निर्माण करून देणारे, मतदारांमध्ये मतदानाचे प्रमाण  वाढावे , आपले  हक्क व कर्तव्याची जाण निर्माण व्हावी यासाठी जनप्रबोधनात्मक कार्य केले.

गणेशोत्सवाच्या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये एक दिवस महिला कर्तृत्व व सन्मानदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महिलांचा महिलांकडून त्यांनी केलेल्या कार्याचा कर्तृत्वाचा कामगिरीचा गृहिणी व विविध क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव करण्याची परंपरा ,महिला या सबल आहेत सक्षम आहेत व त्यांच्या गुणाला प्राधान्य देऊन प्रोत्साहन, प्रेरणा देण्याचे कार्य करीत. 2022 मधील गणेशोत्सवात  देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंडळाने स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्यासाठी झगडणारी व झगडलेले स्वातंत्र्यवीरांचे,संत,अत्यंत आकर्षक  छायाचित्रे, झालर चारशेहून फूट लांब, व दोन फूट रुंदी असलेल्या झालर ,त्यांच्या कार्याची आठवण  दिसून येते. अमृत महोत्सवाच्या या निमित्ताने आजी-माजी सैनिक जवान, अन्नदाता शेतकरी, स्वातंत्र्य सैनिक, आदर्श शिक्षक ,गुणवंत कामगार, क्रीडा क्षेत्रातील गौरवपूर्ण कामगिरी केलेल्या, पुरस्कार मिळालेल्या ,विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीचा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग,यु.पी.सी. पास होऊन व  वर्ग एक व दोन निवड झालेल्या.  आपल्या जीवनामध्ये व कुटुंबामध्ये सक्षमीपणा निर्माण करणाऱ्या आदर्श माता व पिता व ज्येष्ठ नागरिक , सेवानिवृत्त नागरिक इत्यादींचा गौरव त्यांच्या अनुभवाचा  ज्ञानाचा त्यांच्या कर्तृत्वाचा समाजासाठी उपयोग होऊन समाज बलवान व सक्षम लोकशाहीला बळकटी निर्माण करणारा असावा या भावनेपोटी मंडळ या सर्वांचा सन्मान व सत्कार करून  समाजऋन फेडण्याचा प्रयत्न गेली 58 वर्षापासून करीत आला आहे.

मंडळांनी दुर्लक्षित व वंचित समाजातील कुटुंबाला पूजाविधी व सन्मानाचा मान देऊन आपण सर्व भारतीय माणूस आहोत याची आठवण करून देण्याचं कार्य मंडळ करीत आले आहे.

मंडळास जिल्ह्यातील शासन,पोलीस प्रशासन,रोटरी क्लब, नगरपरिषद, व विविध संस्थाप्रमुखचे अनेक पारितोषिक,बक्षिसे,सन्मान  मिळालेले मंडळ आहे. मंडळाचेपदाधिकाऱ्यांसह,कार्यकर्त्ये,गणेशदूत , गणेशभक्त या सर्वाचे अभिनंदन नागरिक करीत आहेत.

मंडळांमध्ये वयाच्या 4 वर्षापासून ते 80 वर्षाच्या वयाचे सभासद राबतात, जोशात शिस्तबद्ध लेझीम खेळ सादर करतात.हे मंडळाचे वैशिष्टय़पूर्ण कार्य आहे.

 
Top