उस्मानाबाद / प्रतिनिधी-

खरीप हंगाम 2021 मधील नुकसान भरपाईचे अंदाजे रु. 400 कोटी दिनांक 27/10/2022 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्यास विमा कंपनी विरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे पत्र जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी दिले आहे., अशी माहिती अामदार राणाजगजितसिंह पाटील यांनी िदली. 

 प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2021 अंतर्गत विमा कंपनीने नुकसान भरपाई ही नुकसानीच्या टक्केवारीनुसार वितरित केली नसल्यामुळे आपल्या सूचनेप्रमाणे विमा कंपनीला अधिकची नुकसान भरपाई वितरित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. या विषयात वारंवार सूचना करून देखील विमा कंपनीने कार्यवाही न केल्याने आपण जिल्हाधिकाऱ्यांना हा विषय विभागीय आयुक्तांकडे पाठविण्याचे सूचित केले होते. त्या अनुषंगाने दिनांक 22/8/2022 रोजी विभागीय तक्रार निवारण समितीची बैठक विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली व विमा कंपनीने आठ दिवसात पैसे जमा न केल्यास कायदेशीर कार्यवाहीच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.

 या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनबरोबर कारवाई बाबत चर्चा झाली व त्यांनी विमा कंपनीला नुकसान भरपाईची उर्वरित 50 टक्के रक्कम (अंदाजे रु. 400 कोटी) ही दिनांक 27/10/2022 पर्यंत जमा न केल्यास भारतीय दंड संहिता 188 अन्वये फौजदारी कारवाई करण्याबाबत व कृषी आयुक्तांकडे प्रशासकीय कार्यवाहीचा प्रस्ताव सादर करण्याबाबतचे पत्र दिले आहे. या विषयात आपला पाठपुरावा ताकदीने राहणार आहे.

 
Top