उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा सोलापूर शिक्षक मतदार संघातून चार वेळा निवडून आलेले शिक्षक आमदार सुरेश पाटील यांचे वयाच्या 82 व्या वर्षी बेळगाव येथे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बेळगाव येथे रविवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ते स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य होते.

 त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

 
Top