उमरगा/प्रतिनिधी -

लोकशाही प्रधान देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर फोडा फोडीच राजकारण कधीच कामाला येत नाही आजपर्यंत जेवढे शिवसेनेतून फुटून गेले त्यातील कोणीही निवडून आले नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे.  सत्ता येते जाते पण सत्तेचा माज येता कामा नये, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

 उमरगा येथील भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेस २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने बँकेच्या भव्य नूतन इमारतीचे उद्घाटन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या हस्ते   करण्यात आले या वेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सतीश चव्हाण होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, माजी आमदार राहुल मोटे, परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे,उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे, सुरेश पाटील, प्रदेश युवती अध्यक्ष अक्षणा सलगर, संजय पाटील दुधगावकर, शैलजताई मगर, मसूद शेख, रमेश बारसकर, भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अश्लेष मोरे, भाऊसाहेब बिराजदार अर्बन कोऑफरेंटीव्ह बँकेचे चेअरमन प्रा सुरेश बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, यावेळी भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढवुन ६,००० मेट्रीक टन करणार आहे. यासोबतच इथेलॉन डिस्टलेरी प्रकल्पासोबतच विज निर्मीती करून या भागाला भारनियमन मुक्त करणार असल्याचे सांगत ऊसाला २५०० चा भाव जाहीर केला. इथेलॉन व विजनिर्मीती प्रकल्प सुरू झाल्यानंतर सर्वाधिक भाव देणार असल्याचे सांगितले.  यावेळी  प्रा.सुरेश दाजी बिराजदार यांनी प्रास्तावीक केलें.  सुत्रसंचालन श्वेता हुल्ले व  बँकेचे संचालक  सुनिल माने यांनी आभार मानले.

यावेळी आमदार विक्रम काळे,  राहुल मोटे, जिवनराव गोरे,डॉ.नरेंद्र काळे,र सक्षणा सलगर,  े वसंतराव नागदे, सुनिल माने,  आश्लेष मोरे, संजय दुधगावकर, महेंद्र धुरगुडे, संजय निंबाळकर, शैलजा मगर, रमेश बारसकर, व्ही.के.पाटील,  सुरेश बिराजदार,पद्माकर हराळकर, मसुद शेख, व्यंकटराव सोनवने, साहेबराव पाटील, गोविंदराव पवार, विजय कुमार सोनवने,माणिकराव बिराजदार, विजयकुमार सोनवणे, रावसाहेब पाटील, महेंद्र धुरगुडे, मसूद शेख, नितीन बागल, नंदकुमार गवारे उपस्थित होते. 


 
Top