परंडा /प्रतिनिधी -

 परंडा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक मनिषा वडेपल्ली यांनी नगर परिषदेत विकास कामात भ्रष्टाचार करून गैरव्यवहार केल्या प्रकरणी येथील काँग्रेस,भाजपा, शिवसेना पक्षाच्या कायकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन तसेच झालेल्या भ्रष्टाचाराची चैकशी औरंगाबाद चे विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती परंतु आद्याप पर्यंत कारवाई झाली नाही कारवाई नाही झाल्यास आत्मदहनाचा इशारा ही देण्यात आला होता. वरिष्ठांनी कुठलीही कारवाईची दखल न घेतल्यामुळे लेखी निवेदन दिलेल्या तारखेत गांधी जयंतीचे औचीत साधुन  सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयाच्या  परिसरात अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. 

   यावेळी आत्मदहनाच्या आंदोलनात काँग्रेसचे ॲड.नुरोद्दीन चौधरी, सेनेचे इस्माईल कुरेशी , एमआयएमचे जमील पठाण , सेनेचे इरफान शेख, भाजपाचे समीर पठाण ( एस.के. ),अजहर शेख , बाशा शहाबर्फीवाले ,सत्तार पठाण ,जावेद पठाण, मुर्तूजा सय्यद आचानक चार चाकी वाहनातून तहसील कार्यालयाच्या परिसरात येऊन  मुख्याधिकारी यांच्या विरोधात घोषणा बाजी करित अंगावर डिझेल ओतून  आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आसताना वेळीच परंडा पोलिसांनी आत्मदहन करणाऱ्यांना झडप मारून पकडल्याने पुढील अनर्थ टळला.त्यानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारावाई करून १० जणांची जामीनावर मुक्ततता करण्यात आली.

   यावेळी पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे ,सहाय्यक पोलिस निरिक्षक हिंगे पो.कॉ.रामराजे शिंदे ,पो.कॉ. आर्यन क्षिरसागर ,पो.कॉ.बळी शिंदे ,पो.कॉ.साधू शेवळे,पो.ना.विशाल खोसे यांचे पथक   तहसील कार्यालयात हजर होते.


 
Top