तुळजापुर  /  प्रतिनिधी - 

 अष्टभुजा उद्योग समूह नवनिर्मिती बहुउद्देशीय महिला मंडळ प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने  आयोजित दांडिया गरब्यास मोठा प्रतिसाद मिळाला. 

सराई धर्मशाळा तुळजापूर येथे दांडिया गरबाचे आयोजन करण्यात आले होते.   यावेळी तुळजापुरातील असंख्य महिला युवती यांनी दांडिया गरबा नृत्यांमध्ये सहभाग घेऊन अतिशय उत्स्फूर्तपणे गरब्याच्या माध्यमातून देवीचा जागर मांडला. 

 यावेळी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मिनाताई सोमाजी यांच्या संकल्पनेतून संध्या खुरूद ,प्रियंका रोचकरी, सुवर्णा उमाप, लता सोमाजी, शिवाणी कदम, अरूणा कावरे,अपर्णा बर्दापूरकर इत्यादी सर्व तुळजापूर नगरीतील महिला युवतींनी सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला. 


 
Top