उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उस्मानाबाद तालुकाध्यक्षपदी केशेगाव येथील सौ.रंजना गणेश भोजने यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते निवडीचे पत्र सौ.भोजने यांना देण्यात आले.

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांच्या आदेशानुसार, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजियाताई खान, प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ.मनीषाताई शिवाजीराव पाटील (राखुंडे) यांनी ही निवड केली आहे. उस्मानाबाद येथे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते निवडीचे पत्र सौ.भोजने यांना देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार राहुल मोटे, शिक्षक आमदार विक्रम काळे, ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, गोकुळ शिंदे,  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी उपनगराध्यक्ष अमित शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते महेंद्र धुरगुडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top