वाशी  /  प्रतिनिधी - 

 येथील ज्येष्ठ नागरिक महासंघ महाराष्ट्र तालुका शाखा वाशीच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर  बुधवंत  होते तर प्रमुख अतिथी म्हणून कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र कटारे, नगरपंचायतचे गोपीनाथ घुले आदी उपस्थित होते. 

 ्रथम सर्व उपस्थित पाहुण्यांचे शाल, श्रीफल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला; त्यानंतर ज्येष्ठ नागरिक श्री. पंडितराव चेडे आबा, भाई भगवानराव उंदरे, अब्बासभाई बागवान, मधुकर धर्माधिकारी, डॉ. मुकुंद जोशी, विठ्ठल बनसोडे, अल्लाबक्ष पटवेकर, मधुकर सुतार, पांडुरंग बप्पा मोळवणे, रावसाहेब मोळवणे, हमीद काझी, बळीराम सुतार, वसंतराव कवडे, बाबुराव बावधनकर अशा ३५ ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. 

 यावेळी प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष हारूण काझी यांनी केले, तर यावेळी सदाशिवराव जगताप, बापू कदम, भाई भगवानराव उंदरे, प्राचार्य कटारे व अध्यक्ष पी. आय. बुधवंत साहेब यांचे मार्गदर्शन झाले. प्रा. शहाजी चेडे,  व एम. आय. मुजावर यांची ही उपस्थिती होती.   

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष हारूण काझी, सचीव बळीराम जगताप, भारत बप्पा मोळवणे, सुधाकर देवडीकर, दिगांबर कवडे, बळीराम कवडे, विठ्ठल साळुंके तसेच युवा कार्यकर्ता विशाल हनुमंत बोराडे यांनी खूपच परिश्रम घेतले; कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन बळीराम जगताप यांनी केले. एकंदरीत हा कार्यक्रम अत्यंत उत्साहाचे वातावरणात संपन्न झाला.


 
Top