उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आ. राणाजगजितसिंह पाटील  यांच्या सुचनेनुसार भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृहाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान नगर पालिकेच्या अधिकारी व कर्मचारी वर्ग यानांही बोलावून घेतले होते. पाहणी केल्यानंतर मागील पाच वर्षामध्ये कोटयावधीचा निधी मिळून देखील नाटयगृह हे अजुन पुर्ण क्षमतेने चालू करण्याबाबत दिरंगाई होत असल्याचे दिसून आले. तसेच नाटयगृह अंतर्गत डागडूजीचे कामे अपुर्ण असल्याचे दिसून आले. एअरकंडीशनचे काम काही प्रमाणात होऊन त्याची फाईनल टेस्टींग अजून झाली नाही.  पीओपी टचअप व्यवस्थीतरित्या काढलेली नाहीत. लाईट कनेक्शनचीही दुरावस्था दिसून आली. तसेच नवीन सांऊउसिस्टीम आणून बसविली, त्याला वीज कनेक्शन नाही, त्याची टेस्टींग नाही, फायर फायटींगचे अपुर्ण काम झाले आहे. तसेच   नाटयगृहातील शौचालय अस्वच्छ असल्याचे दिसून आले. स्टेजवरील ही फर्नीचर मोडकळीस आले आहे. मोठयाप्रमाणमध्ये अस्वच्छता असून काही कामे करताना कुठल्याही प्रकारची काळजी घेतल्याचे दिसून आले नाही. तेथील आसन व्यवस्था बरीच खराब झाली असल्याचे दिसून आले. यावेळी नगरपालिकेतील संबधीत अधिका-यांना जाब विचारला. मोठया प्रमाणामध्ये निधी मिळून सुध्दा कामे का अपुर्ण राहिली, तत्कालीन सत्ताधारी शिवसेने एवढया मोठया वास्तुसाठी आलेला कोटयावधीचा निधी  व्यवस्थीत न वापरल्याने संपुर्ण नाटयगृहाची बकाल अवस्था करून ठेवली आहे. मागील पाच वर्षाच्या काळामधील आलेल्या किती निधी आला व तो कशाप्रकारे खर्च केला याची माहिती लवकरात लवकर नगरपालिकेने द्यावी व राहिलेली अपुर्ण कामे लवकरात लवकर पुर्ण करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. याअगोदरही अनेकवेळा नगरपालिकेला पत्रे देण्यात आली. सदर नाटयगृहाचे काम वेळेत पुर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्या,  पाहणीकरीता भारतीय जनता पार्टीचे भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर,‍  भाजपा जिल्हा उपाध्यक्ष. सुनिल काकडे, माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे, माजी गटनेता  युवराज नळे, माजी नगरसेवक. दत्ता पेठे, बापु पवार, दाजीआप्पा पवार, भाजपा एस्सी. मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.  प्रविण सिरसठ, प्रसाद मुंढेयांनी केली.  तसेच यावेळी नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, शहर अभियंता भारत विधाते,  सफाई अधिकारी सुनिल कांबळे, संभाजी राजेनिबांळकर,  भारत साळुंके, व नगरपालिकेचे इतर  कर्मचारी उपस्थीत होते.

 
Top