तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तालुक्यातील अन्न व नागरी पुरवठा विभाग तहसील कार्यालय तुळजापूर यांचे मार्फत तालुक्यातील सर्व रेशन दुकानातून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेला आनंदाचा शिधा म्हणजेच शंभर रुपयांमध्ये एक किलो साखर ,एक किलो चणाडाळ ,एक किलो रवा आणि एक किलो पामतेल असे चार शिधा जिन्नस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत 

तालुक्यातील जवळपास 45 हजार रेशन कार्डधारकांना सदर योजनेचा धान्य लाभ मिळणार आहे. त्यात अन्‍त्‍योदय योजनेची 4986 रेशन कार्ड,  प्राधान्य योजनेची 29877 रेशन कार्ड व शेतकरी योजनेची 11030  रेशन कार्ड अशी एकूण 45 हजार 893 रेशन कार्ड धारकांनावरील योजनेचा लाभ मिळणार आहे. नागरिकांना पात्र असूनही ही वरील लाभ न मिळाल्यास जिल्हा स्तरावरील तक्रार क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असून त्या द्वारे त्यांच्या तक्रारींचे निरसन करण्यात येणार आहे.


 
Top