तुळजापूर  / प्रतिनिधी-

अश्विनी पोर्णिमादिनी शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या श्री तुळजाभवानी  पुजारी मंडळ, भक्त निवास, मंगल कार्यालय समोरील  फुटपाथवर सोमवार दि.१०रोजी सकाळी  ९वा. चाळीस  वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह सापडल्याने तुळजापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. 

उस्मानाबाद रोडवर असलेल्या पुजारी मंडळ मंगल कार्यालया समोर अनोळखी शरीर बांधा मध्यम उंची 5 फूट 4 इंच , छातीवर उजव्या बाजूस जन्म खुण काळा डाग , पोटावर तीळ अंगात पांढरा शर्ट , पांढरी पँट वगैरे फोटोतील अनोळखी मयताची ओळख , पटली नाही . या घटनेची माहिती दीपक दत्तात्रय निकम  (वय 25 वर्षे ) व्यवसाय मॅनेजर पुजारी मंडळ भक्त निवास राहणार तुळजापूर यांनी तुळजापूर पोलिसांना दिली असता घटनास्थळी तुळजापूर पोलीस दाखल होवुन घटनेचा पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे ठेवण्यात आले . 


 
Top